'अरे देवा...', प्रियांका गांधींचा फाटक्या जीन्सवरून RSS वर निशाणा

rss
rss

नवी दिल्ली - महिलांनी फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत वादात अडकले आहेत. सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. केवळ राजकीयच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनीसुद्धा तीरथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीसुद्धा तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फोटो टाकला आहे. संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेले भाजपचे वरिष्ठ नेते या फोटोमध्ये दिसत आहेत. फोटो पोस्ट करताना प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, अरे देवा, यांचेसुद्धा गुड़घे दिसत आहेत. प्रियांका गांधींनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत दिसतात. संघाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पांढऱा शर्ट आणि हाप पँट घातल्याचंही दिसत आहे. तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सवरून केलेल्या वक्तव्यावरूनच प्रियांका गांधी यांनी टोला लगवाताना या फोटोत असलेल्या नेत्यांचेही गुडघे दिसत आहेत असं म्हटलंय.

तीरथ सिंह रावत हे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांची जीभ घसरली. महिला फाटक्या जीन्स घालून वावरात आणि हे सगळं योग्य आहे का? असले कसले संसक्रा असा प्रश्न त्यांनी विचारला होता. बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जीन्सबाबत केलेलं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आणि त्यावरून तीरथ सिंह रावत टीकेचा धनी ठरले. लहान मुलांवर होणारे संस्कार आणि जडण घडण याला पालकच जबाबदार असतात असं रावत म्हणाले होते. 

जीन्सबाबत सांगताना रावत यांनी एक अनुभव कथन केला. ते म्हणाले की, मी विमानातून प्रवास करताना एक महिला तिच्या दोन मुलांसह बसली होती. तेव्हा महिलेनं फाटकी जीन्स घातली होती. महिलेला विचारलं की कुठे जाणार आहे? तेव्हा त्यांनी दिल्लीला असं सांगितलं. महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक असून महिला एनजीओ चालवते असंही रावत यांनी म्हटलं. त्यानंतर रावत म्हणाले की, माझ्या मनात आलं की जी महिला एनजीओ चालवते आणि फाटकी जीन्स घालते ज्यातून गुडघे दिसतात. अशी महिला समाजाला कोणती संस्कृती दाखवत, पसरवत असेल. आम्ही शाळेत असताना असे काही नव्हते असंही रावत म्हणाले होते. 

रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री गुल पनाग, लेखक आणि संगीतकार वरून ग्रोव्हर, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, राजदच्या नेत्या राबडी देवी यांनीसुद्धा रावत यांना धारेवर धरले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तर रावत यांच्या विधानामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे. आज दिवसभर या संदर्भातील #RippedJeans ट्रेंड चर्चेत होता. अनेक सेलिब्रिटींना त्यांचे फाटकी जीन्स घातलेली छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत रावत यांच्यावर निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com