esakal | फाटलेली जीन्स ठीक आहे, फाटलेल्या इकॉनॉमीचे काय?; उर्मिला यांचा परखड सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

actress Urmila matondkar attacks Uttarakhand cm tirath Singh Rawat comment over ripped jeans

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी फॅशन म्हणून महिलांकडून परिधान केल्या जाणाऱ्या फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

फाटलेली जीन्स ठीक आहे, फाटलेल्या इकॉनॉमीचे काय?; उर्मिला यांचा परखड सवाल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  फाटलेली जीन्स या प्रकरणावरून गुरुवारचा दिवस वादाचा ठरलेला दिसून आला आहे. सोशल मीडियावर काही सेलिब्रेटींनी फाटलेल्या जीन्सचा फोटो व्हायरल केला होता. त्यावरुन भलताच वाद ओढावला आहे. त्यात अनेक सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. बॉलीवूडची कुणाशीही पंगा घेणारी अभिनेत्री कंगणा राणावत. खासदार जया बच्चन, यांच्याशिवाय इतरही काही मान्यवरांचा यात सहभाग आहे. याप्रकरणावरुन शिवसेनेच्या नेता उर्मिला मातोंडकर यांनीही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी जे व्टिट केले आहे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी फॅशन म्हणून महिलांकडून परिधान केल्या जाणाऱ्या फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशा प्रकारचे कपडे घालून महिला आपल्या मुलांना काय शिकवण देतील, असा सवाल रावत यांनी उपस्थित केला होता. रावत यांच्या विधानावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना रावत यांनी स्वत ः विमानात अनुभवलेला प्रसंग सांगितला होता. बूट घातलेल्या महिलेने अशीच दोन्ही गुडघ्यांवर फाटलेली पँट घातली होती, तिच्या हातामध्ये बऱ्याच बांगड्या देखील होत्या. विशेष म्हणजे ती आपल्या दोन मुलांसमवेत प्रवास करत होती. समाजामध्ये वावरणारी, एनजीओ चालविणारी महिला फाटकी जीन्स घालणार असेल तर ती कोणत्या प्रकारच्या मूल्यांची शिकवण देऊ पाहत आहे? असा सवाल रावत यांनी उपस्थित केला होता.

रावत यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांनी त्यांचे विधान लाजीरवाणे असल्याचे सांगत माफीची मागणी केली आहे. रावत यांच्या वक्तव्यावर नेटीझन्सनी देखील टीकेची झोड उठविली होती. अनेक सेलिब्रिटींनीही रावत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.यासगळ्या प्रकरणाविषयी बोलताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, मान्यवर आपल्याला फाटलेली जीन्स दिसून येते. मात्र यापूर्वीच फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय, असा प्रश्न उर्मिला यांनी यावेळी उपस्थित केला आहे. फाटलेल्या जीन्सला सांभाळण्यासाठी युवा पिढी समर्थ आहे. अशाप्रकारे उर्मिला यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग यांच्यावर टीका केली आहे. उर्मिला या आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिध्द आहे. आपल्याला जी गोष्ट चूकीची अथवा बरोबर वाटते त्याविषयी बेधडकपणे बोलणे ही त्यांची वेगळी ओळख आहे.

रावत यांच्या वक्तव्यावर राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री गुल पनाग, लेखक आणि संगीतकार वरून ग्रोव्हर, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, राजदच्या नेत्या राबडी देवी आदी मंडळींनी रावत यांना धारेवर धरले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तर रावत यांच्या विधानामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे. आज दिवसभर या संदर्भातील #RippedJeans ट्रेंड चर्चेत होता. अनेक सेलिब्रिटींना त्यांचे फाटकी जीन्स घातलेली छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत रावत यांच्यावर निशाणा साधला.


 

 
 


 


 

loading image