
''गुणवत्तेच्या आधारावरच काँग्रेसमध्ये मिळणार तिकीट''
हैदराबाद : तुम्ही कितीही मोठे किंवा ताकदवान असाल हे महत्त्वाचं नसून, काँग्रेस पक्ष निवडणुकीत गुणवत्तेच्या आधारावर तिकीट देईल असे थेट विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. तुम्ही गरीब, शेतकऱ्यांसोबत नसाल तर तुम्हाला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते शुक्रवारी तेलंगणातील वारंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते. (Rahul Gandhi Address Rally In Telangana)
राहुल गांधी पुढे म्हणाले की, तेलंगणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांनी आपले रक्त, अश्रू सांडले आणि या स्वप्नासाठी लढा दिला आहे. यासाठी काँग्रेसही तुमच्या पाठीशी उभा होतो. पक्षाला नुकसान होईल हे माहित असतानादेखील काँग्रेसने आणि सोनिया गांधींनी येथील जनतेला नवे राज्य दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत ज्यांच्या पतींनी आत्महत्या केल्या आहेत, त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच निवडणुकीत काँग्रेस टीआरएसला बाहेरचा रस्ता दाखवले असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा: क्रिकेट खेळत नसलो तरी, गुगली टाकता येते; राऊतांची फटकेबाजी
सरकार आल्यास दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ
ज्या व्यक्तीने तेलंगणाचे स्वप्न उद्ध्वस्त केले, तरुण आणि गरीबांचे लाखो, करोडो रुपये लुटले, त्याला आम्ही माफ करणार नाही. असे असले तरी, तेलंगणातील शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जाईल अशी घोषणादेखील यावेळी राहुल गांधी यांनी केली. यासोबतच तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी योग्य किमान आधारभूत किंमत (MSP) लागू करण्याचे आश्वासनही राहुल गांधींनी दिले. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर काही कालावधीत हे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत. ते दोन-तीन भांडवलदारांसाठी काम करतात असा आरोपदेखील त्यांनी यावेळी बोलताना केला.
Web Title: Congress Leader Rahul Gandhi Addressed Gathering In Warangal Telangana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..