
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज चौथ्या दिवशी ED राहुल गांधींची चौकशी करणार
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. यापूर्वी ईडीनं (ED) राहुल गांधींची तीन दिवस चौकशी केलीय. आज चौथ्यांदा राहुल गांधी चौकशीसाठी ईडीसमोर हजर होणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडी राहुल गांधी यांची चौकशी करत आहे.
राहुल गांधींना ईडीनं ज्या प्रकारे चौकशीसाठी बोलावलं होतं, त्यानंतर काँग्रेसनं (Congress) त्याविरोधात देशव्यापी आंदोलन केलं. आज पुन्हा एकदा काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहे. केंद्र सरकार (Central Government) राहुल गांधींविरोधात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. यापूर्वी वानादचे खासदार राहुल गांधी यांची 13 ते 15 जून असे सलग तीन दिवस ईडीनं चौकशी केली होती.
हेही वाचा: Jammu Kashmir : 18 तासांत 7 अतिरेक्यांचा खात्मा; काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई
वृत्तानुसार, राहुल गांधींना ईडीनं शुक्रवारी पुन्हा हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, राहुल गांधींनी त्यांना शुक्रवारी सूट देण्यात यावी, असं आवाहन केलं होतं. यानंतर ईडीनं राहुल गांधींना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावलंय. राहुल गांधी यांचं अपील ईडीनं मान्य केलं. वास्तविक, राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झालीय. अशा परिस्थितीत 17-20 जूनपर्यंत ईडीनं राहुल गांधींना सूट दिली होती. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश (Congress leader Jairam Ramesh) यांनी रविवारी ट्विट केलं आणि लिहिलं की, 'आज लाखो काँग्रेस कार्यकर्ते देशभरात शांततेत आंदोलन करतील. त्यानंतर सायंकाळी काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे.'
Web Title: Congress Leader Rahul Gandhi Appear Before Ed For The Fourth Time In National Herald Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..