
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेप्रकरणी ट्विट केलं आहे. गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे उद्धवस्त करायचं हे मोदी सरकारकडून शिकायला हवं, असं ते म्हणाले आहेत. ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वांसमोर एक शिकवण ठेवली आहे, की जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे उद्धवस्त केलं जावं. 1 फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर केले जाणार आहे.
जेठालालची 50 रुपयांची कमाई लाखांवर गेली; कोटींची मालमत्ता
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आग्रह केला आहे की, त्यांनी तिन्ही कायदे रद्द करावेत. त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या एका कथनाचा हवाला देताना ट्विट केलं आहे. विनम्र पद्धतीने तुम्ही सर्व जग हलवू शकता- महात्मा गांधी. पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तात्काळ सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची आठवण केली.
Mr Modi’s governance is a lesson in how to ruin one of the world’s fastest growing economies.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2021
26 जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर परेड आयोजित केली होती. पण, परेड आपला निर्धारित मार्ग सोडून दिल्लीत शिरली. त्यामुळे पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटी झाल्याचे समोर आले. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधूर कांड्या फोडण्यात आल्या. संतप्त जवानांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अनेक ठिकाणी पोलिसांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. शेतकरी तलवारी घेऊन पोलिसांच्या अंगावर गेल्याचा प्रकारही घडला.
'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'
ट्रॅक्टर परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांनी लाल किल्ला गाठला. हळूहळू याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले. अनेक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढत खालसा पंथाचा धार्मिक झेंडा फडकावला. काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे झेंडे फडकवण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. लाल किल्ल्यावर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यात शेतकऱ्यांसह पोलिस जखमी झाले आहेत. याचप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असल्याचं कळतंय.