esakal | 'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

सावदी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच,  असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी म्हणाले. सावदी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही आधार नाही, काही तारतम्य नसल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. महाजन समितीचा अहवाल आहे
जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याबाबत त्यांनी केलेली मागणी तिथल्या लोकांना खूश करण्यासाठी केली असेल, अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

हेही वाचा-  असे येडे बरळतच असतात; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले

सीमा भागातील वादग्रस्त भाग आमचा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री

कर्नाटक सीमावासींच्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य सरकारची भूमिका आहे, असे सांगताना, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार  उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. 

यापुढे  मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, या शब्दांत ठाकरे यांनी आपला मनोदय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती या पुस्तकातून  देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला.

ajit pawar reaction Maharashtra Karnataka Border Dispute Laxman Savadi