esakal | सोशल मीडियावर राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा; फोटो VIRAL

बोलून बातमी शोधा

rahul gandhi kerala}

मच्छिमार जेव्हा पाण्यात जाळं फेकण्यासाठी जात होते तेव्हा राहुल गांधी यांना राहवलं नाही. त्यांनीही सोबतच उडी मारली आणि पाण्यात उतरले.

सोशल मीडियावर राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा; फोटो VIRAL
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी केरळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मच्छिमारांसोबत बोटीतून समुद्रात फेरी मारली. मच्छिमारांचे रोजचे जीवन आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. बोटीत बसून समुद्रात गेल्यानंतर राहुल गांधींनी मच्छिमारांसोबत समुद्राच्या पाण्यात उडी मारली. त्या व्हिडीओवरून त्यांच्यांवर टीकाही झाली आणि कौतुकही. जवळपास दहा मिनिटे राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात होते. 

मच्छिमार जेव्हा पाण्यात जाळं फेकण्यासाठी जात होते तेव्हा राहुल गांधी यांना राहवलं नाही. त्यांनीही सोबतच उडी मारली आणि पाण्यात उतरले. राहुल गांधी यांच्यासोबत त्यावेळी खासगी सुरक्षा रक्षकही होता. आता यानंतरचा एक फोटो व्हायरल होत असून राहुल गांधींच्या देहयष्टीची चर्चा होत आहे. 

हे वाचा - गोडसेची पूजा करणारा काँग्रेसमध्ये कसा? भाजप नेत्यानं विचारला सवाल

राहुल गांधींचे पॅक अब्स दिसत असल्याचं म्हणत ट्विटरवर अनेक युजर्सनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत. समुद्राच्या पाण्यात पोहून बाहेर आल्यावर राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले. त्यामध्ये राहुल गांधींचे पॅक अब्स दिसत आहेत. देशाच्या राजकारणात मोजकेच राजकारणी आहेत जे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देतात असंही काहींनी म्हटलं आहे. याशिवाय राहुल गांधींनी तरुणांना फिटनेस टिप्स द्याव्यात अशाही कमेंट युजर्सनी केल्या आहेत.

हे वाचा - Fact Check - एकच ब्रिज देशातल्या वेगवेगळ्या भागात कोसळलाय; नेमका कुठं आणि कधी?

एकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट
सध्या राजकारणात असलेले राहुल गांधी जपानी मार्शल आर्ट एकिडोचे एक उत्कृष्ट खेळाडुसुद्धा आहेत. यात त्यांनी ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. राहुल गांधी यांना एकिडोच्या कमीत कमी 130 टेक्निक्स येतात. इतक्या टेक्निक माहिती असलेला कोणीही व्यक्ती फिट राहू शकतो असं त्यांच्या ट्रेनरने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं. सेल्फ डिफेन्ससाठी एकिडो ओळखली जाते. तसंच यामुळे फिट आणि शांत राहण्यास मदत होते.