Fact Check - एकच ब्रिज देशातल्या वेगवेगळ्या भागात कोसळलाय; नेमका कुठं आणि कधी?

bridge collapse old video viral
bridge collapse old video viral

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी सध्या व्हायरल होतात. यात खरं काय, खोटं काय याची माहिती न घेताच फॉरवर्ड करण्याचं प्रमाण जास्त आहे. यावर अंकुश घालण्यासाठी व्हॉटसअॅपसारख्या मेसेजिंग अॅपने फॉरवर्डेड मॅसेज टॅगचे फीचर आणले असले तरीही अफवा पसरतातच. आताही अशीच एक अफवा पसरत आहे. देशातील अनेक भागात एकच व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला संदर्भ मात्र वेगवेगळे जोडले आहेत. यामुळे एकच ब्रिज अनेक ठिकाणी कोसळलाय का असा वेड्यात काढणारा प्रश्नही पडू शकतो.

महाराष्ट्रात ठाणे शहरात ब्रिज कोसळल्याचा आणि त्याखाली काही गाड्या चिरडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही ठिकाणी हा मेट्रोचा पिलर असल्याचं तर काही ठिकाणी पूल असल्याचा दावा केला जात आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र अशी कोणतीही घटना अलिकडच्या काळात घडली नसून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे फोटोज तिथले असल्याचा दावा करत शेअर झाले आहेत.

याआधी हैदराबादमध्ये बालानगर-जीडमेटला इथला फ्लायओव्हर पडल्याचा व्हिडिओ आहे असा दावा करण्यात आला. तर तोच व्हिडिओ वराणसीतल्या ब्रिजचा आहे असंही म्हटलं गेलं.  हैदराबादमध्ये व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेलंगणा सरकारला याची शहानिशा करून तो फेक आहे असं सांगावं लागलं. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आणि इंटरनेटवर व्हायरल होत असलेला फोटो, व्हिडीओ तसंच त्याबाबत केला जाणारा दावा खोटा असल्याचं सांगितलं. व्हायरल होत असलेला व्हिडिओ, फोटो हा वाराणसीतील असून तो जुना असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

घटना नेमकी कधीची?
उत्तर प्रदेशात घडलेल्या दुर्घटनेचा हा व्हिडीओ आहे. वाराणसीत बांधकाम सुरु असताना एक फ्लायओव्हर कोसळला होता.  ही घटना 16 मे 2018 रोजी घडली होती. फ्लायओव्हरचे दोन खांब ढासळल्यानं पुल कोसळला होता.


घटनेत एक लोकल बस आणि काही गाड्या दबल्या होत्या. तसंच दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यूही झाला होता. दुर्घटनेप्रकरणी तेव्हा जबाबदाऱ अधिकारी आणि काँट्रॅक्टरसह 8 जणांना अटकही करण्यात आली होती. 

सोशल मीडियावर पसणाऱ्या अफवा संदर्भात तसंच मजकुराबाबत केंद्र सरकारने नवीन आदेश गुरुवारी जारी केले आहेत. याअतंर्गत फेसबुक, ट्विटरसह इतर सोशशल मीडिया कंपन्यांना हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये अफवा पसरवल्यास तसंच भावना भडकावणाऱी पोस्ट केल्यास ती पहिल्यांदा कोणी केली होती हे आता कंपन्यांना सरकारला सांगावं लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com