esakal | 'तिरस्कार आता क्रिकेटपर्यंत पोहचला'; वासीम जाफरसाठी राहुल गांधींची बॅटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kumble, cricket news, rahul gandhi, Uttrakhand,Wasim Jaffer

उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षकपदावर असताना धर्माच्या आधारावर संघ निवड केल्याचा ठपका वासीम जाफर ठेवण्यात आला आहे.

'तिरस्कार आता क्रिकेटपर्यंत पोहचला'; वासीम जाफरसाठी राहुल गांधींची बॅटिंग

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी धार्मिकतेच्या मुद्यावरुन खेळाच्या मैदानात रंगलेल्या वादात उडी घेतलीय. शनिवारी त्यांनी माजी क्रिकेटर वासीम जाफर अडकलेल्या धार्मिक मुद्यावर भाष्य केले. देशात तिरस्कार पसरवण्याची भावना इतकी सामान्य झाली आहे की, त्याचे पडसाद आता क्रिकेटपर्यंत येऊन पोहचले आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षकपदावर असताना धर्माच्या आधारावर संघ निवड केल्याचा ठपका वासीम जाफर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणानंतर जाफर याने आपली बाजू मांडत पद त्याग करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट क्षेत्रातून मोजक्या मंडळींनी जाफरला पाठिंबा दर्शवला होता. यात अनिल कुंबळे आणि इरफान पठाण या दिग्गजांचा समावेश आहे. 

जाफरसंदर्भातील धार्मिक वादाच्या प्रश्नावर अजिंक्यनं घेतला सावध पवित्रा

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मागील काही वर्षांपासून तिरस्काराचा इतका प्रसार झालाय की देशातील लोकप्रिय खेळही या जाळ्यात अडकलाय. भारत हा आपल्या सर्वांचा आहे. आपली एकजूट मोडू नका, असा संदेशही राहुल गांधी यांनी देशवासियांना दिलाय.   जाफर याला भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पाठिंबा दर्शवला होता. कुंबळे सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या समितीचे अध्यक्ष आहेत.  

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

चेन्नई कसोटीतील दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र अजिंक्यने या प्रकरणावर सावध पवित्रा घेतला होता. सोशल मीडियावर सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी या मुद्यावर बोलावे, असा सूरही उमटल्याचे पाहायला मिळाले होते. 

काय आहे नेमके प्रकरण

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव माहिम वर्मा यांनी जाफरवर गंभीर आरोप केले होते. संघ निवडीमध्ये जाफर धर्माला महत्त्व देत आहे, असे ते म्हणाले होते. या आरोपात काहीच तथ्य नाही, असे जाफरने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. धर्माच्या आधारावर इक्बाल अब्दुल्ला याला कर्णधारपदी निवडणार असल्याचा आरोप खोटा आहे, असे त्याने सांगितले होते.

जय बिस्टा याच्याकडे नेतृत्व देण्याचा विचार करत होता. निवड समितीच्या रिझवान यांच्यासह अन्य सदस्यांनी इक्बालच्या नावाला पंसती दिली. तो वरिष्ठ खेळाडू आहे आणि आयपीएलही खेळला आहे. त्यामुळे त्याच्या नावाला पसंती दिली, असे जाफरने स्पष्टीकरणावेळी सांगितले होते. रणजीमध्ये  सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड नावे असलेल्या जाफरला देशांतर्गत  क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर अशी ओळख आहे.