राहुल गांधींचा ट्रोलर्सना टोमणा; काय म्हणाले पाहा!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात. पूर्वी त्यांना त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर ट्रोल केलं जाययं. राहुल गांधी सोशल मीडियावर कुठं ट्रोल झाले नाहीत, असा एकही दिवस नसायचा. निवडमुकांच्या काळात तर राहुल चांगल्या वाईट दोन्ही कारणांनी चर्चेत होते. आज, शिक्षकदिनाच्या निमित्तानं राहुल यांनी ट्रोलर्स आणि सत्ताधारी भाजपचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते तटकरे यांचा राजीनामा

काय म्हणाले राहुल गांधी?
आज, शिक्षकदिनानिमित्त ट्विटर करताना राहुल यांनी म्हटले आहे की, विरोधकांची विषारी टिप्पणी, दिशाभूल करणारा प्रचार आणि द्वेष यामुळे मी कणखर बनलो. त्यामुळे शिक्षक दिनानिमित्त त्यांचे आभार, असा टोमणा राहुल यांनी लगावलाय. ते म्हणाले, ‘मला ज्यांच्याकडून शिकायला मिळाले, त्या सर्वांना शिक्षक दिनानिमित्त अभिवादन. या सर्वांमध्ये सोशल मीडियावर ट्रोल करणारे, पूर्वग्रहदूषित पत्रकार आणि विखारी टिप्पणी करणारे माझे विरोधक यांचा समावेश आहे. या सर्वांमुळेच मी अधिक कणखर झालो.’

शिवसेनेच्या खासदारांच्या काँग्रेस नेत्याच्या मेळाव्यात राक्षस गाडण्याचा निर्धार

प्रियंका गांधींची पुन्हा ‘मंदी राग’
दरम्यान, देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा सरकारवर टीका केली आहे. देशाची आर्थिक घसरण आणि त्यावर मोदी सरकारचे मौन अधिक धोकादायक असल्याच्या भावना त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. केवळ माफीनामे आणि घोषणाबाजीतून काहीही साध्य होणार नाही. सरकारकडे या समस्येवर कसलाही उपाय नाही, तसेच देशातील लोकांना खात्री देण्याचे सामर्थ्यही त्यांच्याकडे नाही, असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader rahul gandhi teachers day 2019 twitter social media