esakal | Ayodhya Verdict : अयोध्या निकालाबाबत राहुल गांधी म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi-Congress

या निकालाचे न्यायदान करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांवर होती.

Ayodhya Verdict : अयोध्या निकालाबाबत राहुल गांधी म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या निकालाच्या निर्णयाबाबत ट्विट केले आहे.  

''अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जमिनीबाबत सुप्रीम कोर्टाने आज निकाल जाहीर केला. या निकालाचा सन्मान करताना आपण सर्वांनी आपल्यातील सद्भावना जपली पाहिजे. हा काळ आपण सर्व भारतीयांमध्ये बंधुत्व, विश्वास आणि प्रेम जपण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

- कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले इमरान खान यांचे आभार 

तत्पूर्वी, या निकालाचे न्यायदान करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांवर होती.

- भाजप-शिवसेनेला वडिलधारी म्हणून माझा 'हा' सल्ला : शरद पवार

इतर सर्व वादी-प्रतिवादी ग्राह्य न धरता फक्त रामलल्ला आणि सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांनाच खटला लढविण्याचा हक्क आहे, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केले होते. निकाल जाहीर करतानाच न्यायालयाने तीन महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असा आदेशही दिला आहे. 

- Ayodhya Verdict : अयोध्येचा नूर निकालानंतर बदलला! 

अयोध्येतील रामजन्मभूमीची 2.77 एकर वादग्रस्त जागेवर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. गेल्या काही वर्षांपासून ही वादग्रस्त जागा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. निकाल जाहीर करण्याच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी जवान तैनात करण्यात आले होते.