esakal | भाजप-शिवसेनेला वडिलधारी म्हणून माझा 'हा' सल्ला : शरद पवार

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशासमोर असलेला गंभीर प्रश्न सुटला आहे. समाजातील सर्व वर्गाचे हित पाहून हा निर्णय आला आहे. देशातील जनतेला मला आवाहन असून, या निर्णयाचे स्वागत सन्मानाने केले पाहिजे. तसेच शांती ठेवण्याचे काम केले पाहिजे. मैलाचा दगड ठरणारा हा निर्णय आहे.

भाजप-शिवसेनेला वडिलधारी म्हणून माझा 'हा' सल्ला : शरद पवार
sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सर्वाधिक जागा दिल्या आहेत. त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. यापूर्वी सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अनेक शब्दांची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याजवळ जनादेश आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. मित्रांनी एकमेकांशी असे खोटं वागू नये, असे मी वडिलधारी म्हणून सांगतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे. 

Ayodhya Verdict : राजकारणासाठी श्रीरामाचा वापर आतातरी थांबेल : काँग्रेस

याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, की आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशासमोर असलेला गंभीर प्रश्न सुटला आहे. समाजातील सर्व वर्गाचे हित पाहून हा निर्णय आला आहे. देशातील जनतेला मला आवाहन असून, या निर्णयाचे स्वागत सन्मानाने केले पाहिजे. तसेच शांती ठेवण्याचे काम केले पाहिजे. मैलाचा दगड ठरणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशासमोर अयोध्येचा प्रश्न होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मी सरकारमध्ये होते. मुंबईत झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. न्यायालयाने घेतलेला हा निर्णय देशासाठी आहे. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. 

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट