Delhi Violence : दिल्लीच्या दंगलीला गृहमंत्री जबाबदार, मुख्यमंत्री कुठे होते? : सोनिया गांधी

टीम ई-सकाळ
Wednesday, 26 February 2020

- दिल्लीतील गंभीर चिंतेवर काँग्रेस नेत्यांची आपातकालीन बैठक झाली.

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावर काँग्रेस नेत्यांची आपातकालीन बैठक झाली. भाजपच्या अनेक नेत्यांनी भडकावू भाषणं दिली. त्यांच्यामुळेच हा हिंसाचार होत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला. तसेच दिल्लीच्या दंगलीला गृहमंत्री जबाबदार आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. त्यावर सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. त्या म्हणाल्या, दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्री जबाबदार आहेत. पण त्यावेळी मुख्यमंत्री कुठे होते? हा एकप्रकारचा सुनियोजित कट आहे. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायला हवा. देशाची राजधानी याचा शिकार बनली आहे. ज्यावेळी हिंसाचार होत होता तेव्हा गृहमंत्री कुठे होते? ते काय करत होते? मागील रविवारपासून ते कुठे होते. त्यांना गुप्तचर यंत्रणाकडून माहिती मिळाली होती. त्यावर त्यांनी काय केले.

जनतेने शांतता राखावी

या परिस्थितीत दिल्लीतील जनतेने शांतता राखावी, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी यावेळी केले. तसेच उद्या राष्ट्रपती भवनावर मार्च करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Sonia Gandhi talked about Delhi Violence