अनोखं आंदोलन भोवलं, गाढव चोरी प्रकरणी काँग्रेस नेत्याला अटक

congress leader venkat balmoor arrest for donkey theft after using donkey kcr birthday celebration
congress leader venkat balmoor arrest for donkey theft after using donkey kcr birthday celebration
Updated on

तेलंगणा नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते व्यंकटा बालमूर (Venkat Balmoor) यांना गाढव चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी राज्यभरात गाढवांसमोर केक कापण्याची योजना आखली होती.

17 फेब्रुवारी रोजी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काँग्रेसने राज्यभर गाढवासमोर केक कापण्याची योजना आखली होती. त्यावरुन टीआरएस नेत्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री हुजुराबाद शहरातून व्यंकट बालमूरला अटक केली.

सातवाहन विद्यापीठाजवळ गाढवाच्या चेहऱ्यावर केसीआरचा फोटो लावून एनएसयूआयच्या अध्यक्षांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे समोर येत आहे आणि या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

congress leader venkat balmoor arrest for donkey theft after using donkey kcr birthday celebration
भारतातील हे बाजार आहेत जगात कुप्रसिद्ध, अमेरिकेने प्रसिध्द केली यादी

बालामूर यांनी केसीआरच्या वाढदिवसानिमित्त गाढवाचे फोटो असलेले ट्विट केले होते, त्यामध्ये त्यांनी "शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी. खोट्या आश्वासनांसाठी, खोट्या प्रचारासाठी." असे लिहीले होते. दरम्यान या प्रकरणी एकूण सहा काँग्रेस नेत्यांवर आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालमूर यांनी नुकतीच हुजुराबाद पोटनिवडणूक लढवली होती.

congress leader venkat balmoor arrest for donkey theft after using donkey kcr birthday celebration
कुमार विश्वास यांच्या दाव्याची चौकशी होणार, चन्नी यांच्या पत्राला अमित शहांचे उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com