
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरं देण्यात आली. दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोमवारी चर्चेआधीच काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरूर यांचं नाव वक्त्यांच्या यादीत समाविष्ट केलं गेलं नव्हतं. त्यानंतर काँग्रेसचे आणखी एक नेते मनिष तिवारी यांनाही डावलण्यात आलं होतं. यादरम्यान, मनिष तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.