
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचे अल्पकाळचे युद्ध आणि त्यानंतर झालेली शस्त्रसंधी या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धनीतीचे कौतुक केले आहे. पाकसोबत करण्यात आलेली शस्त्रसंधी हे बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित पाऊल असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. तर १९७१ आणि आताची स्थिती यात खूप फरक असल्याचे थरूर यांनी नमूद केले आहे.