
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार आक्रमक होत नसल्यावरून काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर आली. राहुल गांधींच्या सभांना दिल्लीत सुरवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील नेत्यांना प्रचारातील मरगळ झटकण्याच्या आणि आक्रमक प्रचार करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.