कपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ

टीम ई-सकाळ
Monday, 24 August 2020

कपिल सिब्बल यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन, राजीनाम्याची तयारी दाखवलीय.

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये Congress नेतृत्वपदावरून सुरू असलेल्या वादाला आज वेगळं वळण लागलंय. पक्षाचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी ज्येष्ठ नेत्यांना भाजपची फूस लावल्याचा आरोप केलाय. त्यानंतर संतापलेल्या कपिल सिब्बल Kapil Sibbal यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन, राजीनाम्याची तयारी दाखवलीय.

सिब्बल यांची नाराजी
कपिल सिब्बल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दिल्लीती चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यूपीए-1 आणि यूपीए-2च्या काळात ते केंद्रात मंत्रिपदावर होते. पक्षातील 30 वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही पक्षविरोधी वक्तव्य केलं नसल्याचं सांगून, कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये नाराजी व्यक्त केलीय. कोर्टात पक्षाची योग्य बाजू मांडून पक्षाचं प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही आमच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे, अशा शब्दांत सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आणखी वाचा - काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून तीन नावांची चर्चा 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
काँग्रेसमध्ये पक्षातील नेत्यांवर थेट विरोधकांशी हातमीळवणी केल्याचा आरोप बहुदा पहिल्यांदाच झाला आहे. विशेष म्हणजे हा आरोप गांधी घराण्यातील व्यक्तीने केला असल्यामुळं त्याचं गांभीर्य वाढलंय. गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वावरून, नेत्यांमध्ये मतभेद सुरू आहे. काही नेते गांधी घराण्याच्या नेतृत्वासाठी प्रचंड आग्रही आहेत. तर काहींनी गांधी घराण्याबाहेरचं नेतृत्व असावं, अशी इच्छा व्यक्त केलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leadership kapil sibal tweet Rahul Gandhi