
Shakeel Ahmed Khan Son: बिहारची राजधानी पाटणा येथून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुलाचा मृतदेह गर्दानीबाग येथील शासकीय निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.