esakal | प्रियंका गांधींना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. या ट्विटर युजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आणखी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

प्रियंका गांधींना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. या ट्विटर युजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आणखी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली. पंकज द्विवेदी नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशच्या बस्ती येथील पोलिसांनी आयपीसी कलम 506 आणि आयटी कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्राबाबतचे एक वृत्त ट्विट केले होते. त्या ट्विटवर आरोपी ट्विटर युजरने प्रियंका गांधीविरोधात जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज ट्विट केला होता, अशी तक्रार द्विवेदी यांनी केली आहे.

दरम्यान, दोन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक केली नाही. पोलिसांनी आरोपीला लवकर अटक करावी अशी”, मागणी उत्तर प्रदेश कॉग्रेसचे (मीडिया विभाग) संयोजक ललन कुमार यांनी केली आहे.