
Congress : तुमच्या घरातला कुत्रा तरी देशासाठी मेलाय? मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपला सवाल
Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहोचली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी (19 डिसेंबर) राज्यातील अलवर येथे एका सभेत लोकांना संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. खरगे यांनी आमच्या लोकांनी देशासाठी बलिदान दिले, पण भाजपने कोणते बलिदान दिले असा सवाल केला आहे.
अलवरमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, आम्ही देशासाठी जीव दिला, तुम्ही काय केले? तुमच्या घरातील कुत्रा तरी देशासाठी मेला आहे का? तुम्ही काही त्याग केला आहे का? नाही. यानंतरही ते देशभक्त आहेत आणि आपण काही बोललो तर देशद्रोही आहोत.
हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
एलएसीवरील तणावाच्या मुद्द्यावर खर्गे म्हणाले की, आम्हाला चीनसोबतच्या सीमेवरील संघर्षावर सभागृहात चर्चा हवी आहे, परंतु सरकार चर्चेसाठी तयार नाही. तो बाहेर तर सिंहासारखा बोलतो पण प्रत्यक्षात तो उंदराच्या चालीने चालचो. आम्ही देशासोबत आहोत पण सरकार महत्त्वाची माहिती लपवत आहे.
हेही वाचा: Lionel Messi : मेस्सीचा जन्म आसाममध्ये, कॉंग्रेस खासदारानं तोडले अकलेचे तारे
अलवरमध्ये राहुल गांधींनी भाजप इंग्रजीच्या विरोधात असल्याचा आरोप केला . ते म्हणाले की, भाजपचे नेते जिथे जातात तिथे इंग्रजीच्या विरोधात बोलतात. शाळांमध्ये इंग्रजी शिकवू नये. कधी कधी तुम्ही त्यांना विचाराल की त्यांचा मुलगा कोणत्या शाळेत शिकतो? त्यांच्या सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदारांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
हेही वाचा: FIFA World Cup 2022 : देशात बिकीनीवरून ट्रोल होणाऱ्या दीपिकाने कतारमध्ये केले वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण
राहुल गांधी पुढे म्हणाले की, यांना वाटत नाही की गरीबांची मुलं इग्रजी शिकावीत, हिंदी किंवा इतर भाषा शिकू नयेत असे माझे म्हणणे नाही,, पण जगातील इतर देशांशी बोलायचे असेल तर तिथे हिंदी चालणार नाही, तिथे फक्त इंग्रजीच चालेल.