मोदी आता भागवतांनासु्द्धा दहशतवादी म्हणतील, लोकशाही फक्त कल्पनेत - राहुल गांधी

टीम ई सकाळ
Thursday, 24 December 2020

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. भारतात आता लोकशाही राहिली नाही. हे फक्त आता कल्पनेत उरलं आहे असं राहुल गांधींनी म्हटलं.

नवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले असताना गुरुवारी पोलिसांनी प्रियांका गांधींसह काही नेत्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. भारतात आता लोकशाही राहिली नाही. हे फक्त आता कल्पनेत उरलं आहे असं राहुल गांधींनी म्हटलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जे कोणी उभे राहतात त्यांना दहशतवादी घोषित केलं जात आहे. भारतात आता लोकशाही उरलेली नाही असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. विचारला. पंतप्रधान मोदी फक्त धनदांडग्यांसाठी पैसै उभारत आहेत. जे कोणी त्यांच्याविरोधात बोलण्याचा उभा राहण्याचा प्रयत्न करतील त्यांना दहशतवादी, देशद्रोही म्हटलं जाईल. मग तो शेतकरी असो, कामगार असो किंवा सरसंघचालक मोहन भागवत असोत असंही राहुल गांधी म्हणाले. 

भारत चीन तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. ते म्हणाले की, चीनने भारताची हजारो किलोमीटर जमीन हडप केली तरी मोदी काही बोलत नाहीत. ते गप्प का आहेत असा सवाल राहुल गांधींनी 

राहुल गांधी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विजय चौकातून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढत होते. त्यावेळी आधी मोर्चाला पोलिसांनी रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींसह पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress march on rashtrapati bhavan rahul gandhi reaction after meet president