
बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील नथूपूर गावात गुरुवारी संध्याकाळी काँग्रेस आमदार मनोज कुमार यांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रोड रेजच्या वादातून घडल्याचे सांगितले जात असून, या हल्ल्यात आमदार मनोज कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.