'भाजपशासित राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी महिलांना कुणासोबत तरी झोपावं लागतं'

आमदार प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र आहेत.
MLA Priyank Kharge
MLA Priyank Khargeesakal
Summary

आमदार प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र आहेत.

कलबुर्गी (कर्नाटक) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे प्रवक्ते आणि आमदार प्रियांक खर्गे (MLA Priyank Kharge) यांनी शुक्रवारी भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. काँग्रेस नेते प्रियांक खर्गे म्हणाले, राज्यात सरकारी नोकऱ्या (Government Job) मिळवण्यासाठी पुरुषांना लाच द्यावी लागते, तर महिलांना कुणासोबत तरी झोपावं लागतं, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केलाय.

खर्गे यांनी भरती घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी अथवा विशेष तपास पथकाव्दारे (एसआयटी) चौकशीची मागणी केलीय. सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचीही त्यांची मागणी आहे. विविध पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात भाजपचा सहभाग असल्याचा दावा करत खर्गे म्हणाले, 'सरकारनं पदं विकण्याचा निर्णय घेतलाय. तरुणींना सरकारी नोकऱ्या हव्या असतील, तर त्यांना कोणासोबत तरी झोपावं लागेल.'

MLA Priyank Kharge
Supreme Court : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

खर्गे पुढं म्हणाले, एका मंत्र्यानं मुलीला नोकरीसाठी त्याच्यासोबत झोपायला सांगितलं होतं, अशीही माहिती त्यांनी यावेळी उघड केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर, तिनं राजीनामा दिला, असं त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं (KPTCL) सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता अशा एकूण 1,492 पदांची भरती केलीय. "ब्लूटूथ वापरून परीक्षा लिहिणाऱ्या एका उमेदवाराला गोकाकमध्ये (Gokak) अटक करण्यात आली. माझ्याकडं असलेल्या माहितीनुसार, एकूण 600 पदांसाठी हा करार झाला असण्याची शक्यता आहे. सहाय्यक अभियंता पदासाठी 50 लाखांची लाच घेतली असून कनिष्ठ अभियंता पदासाठी 30 लाख रुपये देण्यात आले आहेत. या भरतीत 300 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र आहेत.

MLA Priyank Kharge
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला; केंद्रीय मंत्र्याचा हल्लाबोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com