2 सपा नेते, काँग्रेस आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश | UP Assembly Elections | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

UP : 2 सपा नेते, काँग्रेस आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये (UP Assembly Elections) निवडणूक प्रचाराची रणधुमाळी वाढत असतानाच पक्ष सोडण्याची आणि प्रवेश करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाचे दोन नेते आणि काँग्रेसच्या (congress) एका आमदाराने बुधवारी (ता.१२) भारतीय जनता पक्षात(bjp) प्रवेश केला. त्याचवेळी मंगळवारी योगी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनी 14 जानेवारी रोजी समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्लीत काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, सपा नेते हरी ओम यादव आणि डॉ. धरमपाल सिंह यांनी भगवा पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसचे आमदार नरेश सैनी यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि सपा या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना पक्षाचे सदस्य करण्यात आले. बेहत येथील काँग्रेसचे आमदार सैनी यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये राहून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांनी आज आपला निर्णय बदलला. हरी ओम हे सिरसागंजचे आमदार आहेत तर डॉ. धरमपाल हे सपाचे माजी आमदार आहेत.

भाजप सोडून गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपण सपामध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले आहे. 14 जानेवारी रोजी सपामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मंगळवारी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मौर्य यांनी राजीनामा दिला. यानंतर ते सपामध्ये जाणार असल्याच्या चर्चेला जोर आला. शुक्रवारी मौर्य आपल्या समर्थकांसह सपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मौर्य यांच्यासह सपामध्ये दाखल झालेल्या त्यांच्या समर्थकांनाही पक्षात स्थान दिले जाणार आहे.

मौर्य म्हणाले, 'मी 14 जानेवारीला समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहे. मला कोणत्याही लहान-मोठ्या नेत्याचा फोन आलेला नाही. त्यांनी वेळीच जागरूक राहून जनतेच्या प्रश्नांवर काम केले असते तर भारतीय जनता पक्षाला हे दिवस पहावे लागले नसते.

हेही वाचा: Omicron test kit आजपासून दुकानांत उपलब्ध, जाणून घ्या किंमत व माहिती

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत भाजपची बैठक सुरू असून, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आज लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला त्यांचे काका शिवपाल यादव आणि आघाडीतील मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातील बहुतांश ओबीसी पक्ष आपल्यासोबत असल्याचा संदेश देण्याचा सपा अध्यक्षांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; निवृत्त जज इंदु मल्होत्रा करणार चौकशी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top