सोनियांचा सूचक निर्णय! स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष?

Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi
Congress party Rahul Gandhi and Sonia GandhiSakal

नवी दिल्ली - भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली. अनेक नेते काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यातच मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. आता काँग्रेसअध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार असून ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Congress president news in Marathi)

Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi
आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूहृदयसम्राट ; आमदार नितेश राणेंकडून उल्लेख

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकूल वासनिक यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीच्या प्रभारी पदावरून मुक्त केलं आहे. त्यांच्या जागी जेपी अग्रवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र सोनिया गांधी यांच्या या निर्णयामुळे वासनिक काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातून होत आहे. तर अशोक गेहलोत यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र आता कोणाची वर्णी लागते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या दोघांनी नकार दिल्यास वासनिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. असं झाल्यास, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान होऊ शकतो.

Congress party Rahul Gandhi and Sonia Gandhi
आता राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

याआधी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षविरोधी विधान केल्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचं बोललं जात आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्ष करण्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र नव्या घडामोडींमुळे मुकूल वासनिक यांचे नाव पुढे आले आहे. वासनिक हे तीनवेळा खासदार राहिलेले आहे. तसेच सर्वात कमी वयात संसदेत पोहोचलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे.

दरम्यान काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत असून या यात्रेत राहुल साडेतीन हजार किमी प्रवास करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा असून ती १२ राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेनंतरही अध्यक्षपदाचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com