Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधींनी घेतली कोरोनाची लस; संसदेत दोन दिवस अनुपस्थिती

Published on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल आणि एकूणच कोरोना प्रकरण हाताळणीबाबत राहुल गांधी सातत्याने आक्रमक दिसून येतात. राहुल गांधी स्वत: कधी लस घेणार आहेत, याबाबत सातत्याने भाजपकडून विचारणा केली जात होती. मात्र, आता राहुल गांधींनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे, ते काल आणि आज संसदेत अनुपस्थिती होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांनी कोणती लस घेतलीय, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाहीये.

गेल्या दीड वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचं संकट घोंघावत आहे. असा कोणताही देश नाही ज्याला या विषाणूची झळ पोहोचलेली नाही. विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशातील आतापर्यंत 45 कोटी 60 लाख 33 हजार 754 लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com