Shashi Tharoor | काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MP Shashi Tharoor has received France highest civilian honour

काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, चेव्हलियर दे ला लीजन डी'ऑनर (द लीजन ऑफ ऑनर) मिळाला आहे. नेपोलियन बोनापार्टने 1802 मध्ये स्थापित केलेला फ्रेंच ऑर्डर ऑफ मेरिट उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी वर्तनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो केला जातो. या सन्मानाच्या घोषणेनंतर ट्विटरवर थरूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, थरूर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

थरूर यांना या सन्मानाबद्दल फ्रान्स सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. यापूर्वी 2010 मध्ये, थरूर यांना स्पॅनिश सरकारकडून असाच सन्मान मिळाला होता, जेव्हा स्पेनच्या राजाने त्यांना एन्कोमिंडा डे ला रिअल ऑर्डर एस्पॅनोला डी कार्लोस III बहाल केला होता.

शशी थरूर हे तिरुअनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दोन वेळा लोकसभेचे खासदार आहेत आणि परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वीच्या UPA सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

टॅग्स :Shashi TharoorCongress