Shashi Tharoor : काँग्रेसच्या शशी थरूरांना झालंय तरी काय? व्हीलचेअरवर बसून गाठलं संसद भवन!

व्हीलचेअरवर बसलेला फोटो थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलाय.
Shashi Tharoor Injured
Shashi Tharoor Injured esakal
Summary

व्हीलचेअरवर बसलेला फोटो थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलाय.

Shashi Tharoor Injured : काँग्रेस खासदार शशी थरूर मंगळवारी व्हीलचेअरवर बसून संसद भवनात (Sansad Bhavan) पोहोचले. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

त्याचं झालं असं की, केरळमधील तिरुअनंतपुरमचे (Kerala Thiruvananthapuram) लोकसभा खासदार थरूर हे 15 डिसेंबर 2022 रोजी संसद भवनाच्या पायऱ्यांवरुन कोसळले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. या दुर्घटनेनंतर थरूर मंगळवारी (20 डिसेंबर) प्रथमच व्हीलचेअरवर (Wheelchair) बसून संसदेत पोहोचले.

Shashi Tharoor Injured
Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंविरोधात मी निवडणूक लढवणार नाही; साउथच्या 'या' अभिनेत्याची मोठी घोषणा

संसद भवनाच्या पायर्‍यांवरुन खाली उतरत असताना शशी थरूर यांचा पाय घसरला आणि ते पायऱ्यांवरुन कोसळले. दरम्यान, त्यांना थोडी जखमीही झाली. त्यानंतर व्हीलचेअरवर बसून थरूर यांनी संसद भवन गाठलं आणि सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला.

Shashi Tharoor Injured
Ajit Pawar : सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसं उत्तर द्यायला हवं; सीमावादावरुन अजित पवार आक्रमक

व्हीलचेअरवर बसलेला फोटोही थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलाय. काँग्रेस खासदारानं ट्विटरवर व्हीलचेअरवर बसलेला स्वत:चा फोटो शेअर करत लिहिलंय, अपंग लोकांसाठी भारतातील व्यवस्था किती खराब आहे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

Shashi Tharoor Injured
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत, तेव्हा उगाच आकडा लावून..; राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

शशी थरूर यांनी ट्विटरवर लिहिलंय, 'जेव्हा तुम्हाला व्हीलचेअरवर बसून संसदेत प्रवेश करावा लागतो, तेव्हा रॅम्प असलेलं एकच प्रवेशद्वार (गेट क्रमांक 9) असतं. सहाय्यकांच्या मदतीनं लोकसभेत पोहोचण्यासाठी मला चार मिनिटं लागली. या तात्पुरत्या अपंगत्वानं मला शिकवलंय की, आमची यंत्रणा अपंग लोकांना किती कमी मदत करते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com