चंद्राबाबू नायडूंविरोधात मी निवडणूक लढवणार नाही; साउथच्या 'या' अभिनेत्याची मोठी घोषणा I Chandrababu Naidu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrababu Naidu

आंध्र प्रदेशात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंविरोधात मी निवडणूक लढवणार नाही; साउथच्या 'या' अभिनेत्याची मोठी घोषणा

तिरुपती : आंध्र प्रदेशातील कुप्पम विधानसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या विरोधात दक्षिण भारतीय अभिनेता विशालनं (Actor Vishal) निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारलीये.

कुप्पम मतदारसंघातून (Kuppam Constituency) निवडणूक लढवणार नसल्याचं विशालनं स्पष्ट केलंय. दरम्यान, लोकप्रिय अभिनेता आणि तमिळ चित्रपट निर्माता विशालनं मंगळवारी सांगितलं की, 'मला नायडूंपेक्षा मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी अधिक आवडतात.'

हेही वाचा: Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

अभिनेता विशाल पुढं म्हणाला, 'मी चंद्राबाबू नायडूंचा प्रतिस्पर्धी म्हणून कुप्पम मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीये. कुप्पम मतदारसंघात आमचे बरेच व्यवसाय असले, तरी जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात येण्याची मला गरज वाटत नाही.'

हेही वाचा: Gram Panchayat Result : एकमेकींविरोधात दोघींचा जोरदार प्रचार; अखेरच्या क्षणी सूनच ठरली सासूवर भारी

नजीकच्या काळात राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर विशाल म्हणाला, मी निवडणुकीत सहभाग घेणार नाहीये. मला कुप्पम मतदारसंघाची सर्व माहिती आहे. पण, आमदारांपेक्षा अभिनेता म्हणून मी जास्त कमाई करु शकतो, असंही त्यानं स्पष्ट केलं.

हेही वाचा: Gram Panchayat Election : वाह, क्या बात है! परदेशातलं उच्च शिक्षण सोडून आली अन् बनली सर्वात तरुण महिला सरपंच

आंध्र प्रदेशात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये 175 जागांसह YSRCP नं पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन केलं, त्यानंतर जगन मोहन रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2024 च्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केलीये.