मी अशा गोष्टींना...; महुआ मोइत्रा यांच्या सोबतच्या व्हायरल फोटोचं सत्य शशी थरुरांनी सांगितलं

Congress MP Shashi Tharoor said his photos with firebrand TMC leader Mahua Moitra that circulated online
Congress MP Shashi Tharoor said his photos with firebrand TMC leader Mahua Moitra that circulated online

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. या फोटोमध्ये दोन्ही नेते एका पार्टीमध्ये सोबत असल्याचं दिसत आहेत. या फोटोवरुन शशी थरुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थरुर यांनी ट्रोल करणाऱ्यांना झापलं असून हे खालच्या पातळीचे राजकारण असल्याचं म्हटलं आहे.

शशी थरुर आणि महुआ मोइत्रा यांच्या दोघांचा फोटो ऑनलाईन शेअर केला जात आहे. थरुर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, सदर फोटो महुआ मोईत्रा यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचा आहे. यावेळी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. सदर फोटो छेडछाड करुन सादर करण्यात आला आहे. सिक्रेट मिटिंग असल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे.

Congress MP Shashi Tharoor said his photos with firebrand TMC leader Mahua Moitra that circulated online
Rajasthan Elections: राजस्थानसाठी काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजेंचा मतदारसंघ ठरला

हे खूप खालच्या पातळीचे राजकारण आहे, असं थरुर केरळच्या कोट्टायम येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्या दिवशी महुआ मोइत्रा यांचा वाढदिवस होता. त्या माझ्यासाठी लहान मुलीसारख्या आहेत. त्या माझ्यापेक्षा १० ते २० वर्षांनी लहान आहेत.

त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. कार्यक्रमाला जवळपास १५ पाहुणे जमले होते. माझ्या बहिणीलाही निमंत्रण होते. त्यामुळे त्याही आल्या होत्या. पण, काही लोकांचा जाणीवपूर्वक फोटो क्रॉप केला आहे आणि एखाद्यी सिक्रेट मिटिंग असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. ही सिक्रेट मिटिंग होती तर फोटो कोण घेतला हे लोकांना कळायला हवं, असं ते म्हणाले.

Congress MP Shashi Tharoor said his photos with firebrand TMC leader Mahua Moitra that circulated online
MP Assembly Election : काँग्रेस मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकणार? २२ मतदारसंघांत अल्पसंख्याकांची मते निर्णायक

मी अशा प्रकारच्या गोष्टींना जास्त महत्व देत नाही. मी लोकांशी बांधिल असून त्यांच्यासाठी काम करत राहीन, असंही थरुर म्हणाले. महुआ मोइत्रा यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व भाजपच्या आयटी सेलचे काम आहे. इतर लोकांना फोटोमधून क्रॉप करुन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असा आरोप त्यांनी केला. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com