
देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसानं हाहाकार उडाला आहे. पंजाब पासून उत्तराखंडपर्यंत पावसाची संततधार सुरू आहे. पंजाबमध्ये पूरस्थिती भीषण बनली आहे. तर बिहारलासुद्धा पावसाचा तडाखा बसलाय. काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. याच पुराची पाहणी कऱण्यासाठी काँग्रेस खासदार कार्यकर्त्यांसह गेले होते. पण पूरग्रस्त भागात चिखल अन् पाणी पाहून ते थेट कार्यकर्त्याच्या पाठीवर बसले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.