इंधन दरवाढीविरोधात ऑनलाइन आंदोलन; काँग्रेसकडून सरकारवर टीका

congress
congress

नवी दिल्ली - सीमावादासोबतच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीन आणि कोरोना संकटात सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले असून, इंधन दरवाढीतून मध्यमवर्गीयांच्या जखमांवर सरकारकडून मीठ चोळले जात आहे, असा खरमरीत हल्ला काँग्रेसने चढविला आहे. 

सोनिया गांधींनी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ सुरूच असल्याने काँग्रेसने सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीच्या विरोधातील #Speak UpAgainstFuelHike या ऑनलाइन आंदोलनाची सुरुवात केली. यानिमित्ताने राहुल यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, ‘सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीतून नफेखोरी बंद करावी. आर्थिक संकटाचा सर्वाधिक फटका गरीब मजूर, शेतकरी, नोकरदार मध्यमवर्गाला बसला आहे. १५ उद्योगपतींच्या खिशात कोट्यवधी रुपये टाकल्याचेही राहुल म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरवाढीतून १८ लाख कोटींची वसुली 
इंधन दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्षा अध्यक्षा सोनिया गांधींनी केंद्र सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करताना, सरकारने तीन महिन्यांत २२ वेळा इंधन दरवाढ करून १८ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली केली, अशी तोफही डागली. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. संकटकाळात सरकार बळजबरीने वसुली करत आहे असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com