प्रत्येक निर्णयाला काँग्रेसचा विरोध - शहा

पीटीआय
Thursday, 10 October 2019

निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. मात्र आमच्या विरोधकांना कळतच नाही की सुरवात पूर्वेकडून, पश्‍चिमेकडून करावी की उत्तर अथवा दक्षिणेकडून करायची. त्यांना दिशाच सापडत नाही.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

कैथाल (हरियाना) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियानातील विधानसभा निवडणुकीत कैथलमधील प्रचारसभेत बुधवारी त्यांनी जम्मू-काश्‍मीरमधील ३७० वे कलम हटविल्याच्या आणि राफेल लढाऊ विमानाची पूजा केल्याने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून कडाडून टीका केली. राहुल गांधी यांनी ते ३७० वे कलम रद्द केल्याच्या बाजूने की विरोधात आहेत, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.  

दिवसभरात त्यांनी तीन प्रचारसभा घेतल्या. कैथलमधील सभेत ते म्हणाले, ‘‘भाजप जे काही करते, त्याला काँग्रेस विरोध करते. ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचा राजकारणाशी संबंध नाही. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला, पण काँग्रेसने त्याविरोधात मतदान केले. ‘‘

हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. या वेळी भाजप भाजप ७५ पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कैथला मतदारसंघातून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे पुन्हा नशीब अजमावीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress opposes every decision amit shah politics