esakal | कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक;येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक;येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी

सिंघवी यांनी विरोधी नेते सिद्धरामय्या यांच्या आरोपाचा दाखला दिला.येडीयुरप्पा यांचा मुलगा बी. वाय.विजयेंद्र याने बंगळुर विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक;येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. येडीयुरप्पा, त्यांचा मुलगा, नातू आणि जावई यांच्यावर 662 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय जनता पक्ष तसेच मुख्यमंत्र्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. कर्नाटकमधील त्यांचे सरकार भ्रष्ट आणि कलंकित नेते सत्तेवर असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंघवी यांनी विरोधी नेते सिद्धरामय्या यांच्या आरोपाचा दाखला दिला. येडीयुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र याने बंगळुर विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून लाच घेतल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. विजयेंद्र व येडीयुरप्पा यांचा नातू यांच्यातील ऑडिओ तसेच व्हॉटस अॅप संभाषण हा पुरावा असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावा आहे. लाच देणारा आणि घेणारा असे दोघे समोर असूनही गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर सिंघवी यांनी पाठोपाठ प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, इतके आरोप होत असूनही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विशेष सूट आहे का ? इतके होऊनही केंद्र सरकार गप्प का आहे ? विजयेंद्र यांच्यावर गुन्हेगारी कारवाई का होत नाही?

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदींना टोला
सिंघवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला. येडीयुरप्पा यांच्यासंदर्भात रखवालदार का झोपा काढत आहेत, असा सवाल विचारत ते थेट म्हणाले की, तुम्ही इतरांच्या घरांसाठी रखवालदार आहात, पण तुमच्या स्वतःच्या घरात भ्रष्टाचार होऊ देत आहात हे दुर्दैवी आहे.

loading image