ममता बॅनर्जींच्या पक्षानं वाढवली काँग्रेस नेत्यांची चिंता; भाजपविरोधी मतं फुटण्याची भीती I Mamata Banerjee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee-Sonia Gandhi

दक्षिणेत काँग्रेस कमकुवत झाली असली, तरी पक्षाला अजूनही पुनरागमनाची आशा आहे.

ममता बॅनर्जींच्या पक्षानं वाढवली काँग्रेस नेत्यांची चिंता

ईशान्य आणि गोव्यानंतर दक्षिण भारतात पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तृणमूल काँग्रेसपासून (Trinamool Congress Party) काँग्रेस सावध झालीय. पक्षाला भीती आहे, की इतर राज्यांप्रमाणेच दक्षिणेकडील राज्यांतही टीएमसी काँग्रेस नेत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळं काँग्रेस पक्ष (Congress Party) आता सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

दक्षिणेत काँग्रेस कमकुवत झाली असली, तरी पक्षाला अजूनही पुनरागमनाची आशा आहे. तामिळनाडूत (Tamil Nadu) हा पक्ष द्रमुकसोबतच्या आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. त्याचबरोबर केरळात (Kerala) यूडीएफचे नेतृत्व करत आहे. पुद्दुचेरीमध्येही विजयी घोडदौड सुरू आहे. मात्र, कर्नाटकबाबत पक्ष अत्यंत गंभीर झालाय. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, जर सर्व काही सुरळीत झालं तर कर्नाटकात पुढील सरकार काँग्रेसचंच असेल. कारण, कर्नाटकात भाजपशी फक्त काँग्रेसच स्पर्धा करू शकतं; पण कर्नाटकात पाय रोवण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या (Mamata Banerjee) प्रयत्नांमुळं पक्षाची आता चिंता वाढलीय.

हेही वाचा: अजित पवारांना कोण ओळखतंय म्हणणाऱ्या राणेंना सेना आमदारांचं चोख प्रत्युत्तर

कर्नाटक काँग्रेसमध्ये (Karnataka Congress) सर्व काही ठीक नाहीय. अनेक नेत्यांमध्ये मतभेद सुरु आहेत. राज्य काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं की, आम्हाला आमचं 'घर' दुरुस्त करावं लागेल. तसं झालं नाही, तर इतर राज्यांप्रमाणेच पक्षाचे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. त्यामुळं अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तेलंगणा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मेरी शशिधर रेड्डी (Meri Reddy) यांनी म्हटलंय, तृणमूल काँग्रेस दक्षिणेत चाचणी घेत आहे. टीएमसीनं कर्नाटक आणि तेलंगणातील काही नेत्यांशीही संपर्क साधला होता, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: ओपन ऑडीमधून उदयनराजेंची साताऱ्यात सफर

Web Title: Congress Party Alerted By Mamata Banerjee Entry In Karnataka Fear Of Splitting Anti Bjp Votes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top