ओपन ऑडीमधून उदयनराजेंची साताऱ्यात सफर

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

उदयनराजे हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो.

सातारा : उदयनराजे (Udayanraje Bhosale) हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते.

आता पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले चर्चेचा विषय बनले आहेत. साताऱ्यात (Satara) उदयनराजेंचा अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या एका चाहत्यानं आपल्या ओपन ऑडी कार मधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली.

Udayanraje Bhosale
Style Is Style : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग

मग काय? विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये (Audi Car) स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. चाहत्यांनी त्यांचा Video रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com