
सोनिया गांधींच्या 'ईडी' चौकशीच्या दिवशी काँग्रेसकडून दिल्लीत 'सत्याग्रह'
नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागील काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी कऱण्यात येत आहे. यावरून देशभरातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचे आरोप केले आहे. त्यातच आता 26 जुलै रोजी पुन्हा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. सोनिया यांच्या चौकशीच्या वेळी दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन कऱण्यात येणार आहे. (Sonia Gandhi ED inquiry)
हेही वाचा: National Herald Case: काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण? कसे अडकले सोनिया आणि राहुल गांधी
काँग्रेस पक्षाने सर्व राज्यातील संघटकांना 26 जुलै रोजी शांततापूर्ण 'सत्याग्रह' आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी ईडीसमोर हजर होतील तेव्हा सर्व खासदार, AICC जनरल सेक्रेटरी आणि CWC सदस्यांना दिल्लीत आयोजित सत्याग्रहात सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ईडीकडून सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी होणार असून याआधी एकदा सोनिया गांधी यांची चौकशी झाली आहे. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची देखील ईडीकडून चौकशी झाली आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधीत मनीलॉन्ड्रींग प्रकरणी गांधी कुटुंबाची चौकशी करण्यात येत आहे.
Web Title: Congress Party Organise A Peaceful Satyagraha On July 26
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..