तीनशे युनिट मोफत वीज : हिमाचल प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress policy statement Himachal Pradesh development

तीनशे युनिट मोफत वीज : हिमाचल प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

सिमला : हिमाचलच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेसने आज हिमाचलसाठी जाहीरनामा जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत एक लाख नोकऱ्यांची घोषणा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

महिलांना ‘हर घर लक्ष्मी’ या योजनेर्तंगत दरमहा दीड हजार रुपये, प्रत्येक मतदारसंघात इंग्रजी माध्यमांच्या चार शाळा, जुनी पेन्शन योजना यासह महत्त्वाची दहा आश्‍वासने दिली. मोफत वीज, गाय खरेदीसाठी अंशदान, दूध खरेदी, कृषी आणि बागायतदार आयोगाची नेमणूक केली जाणार असून त्यात शेतकऱ्यांना पुरेसे स्थान दिले जाईल, याचाही आश्‍वासनात समावेश आहे.

५१ पानी जाहीरनाम्यात पक्षाने १६ क्षेत्राचा विषयांचा समावेश केला आहे. येथील पक्षाच्या कार्यालयात राजीव भवन येथे जाहीरनामा जाहीर केला. काँग्रेसने ‘हिमाचल, हिमाचलियत और हम’ असे नाव दिले आहे. काँग्रेसने ‘आपले प्रतिज्ञापत्र-२०२२’ असे नाव दिले आहे.

अन्य घोषणा

 • प्रत्येक घराला दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज.

 • चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय ६० करणार

 • १८ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये

 • दरवर्षी एक लाख नोकऱ्यांची निर्मिती

 • जयराम सरकारकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्या रद्द करणार

 • ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी भू अधिग्रहण कायदा लागू करून जमीन मालकांना चारपट मोबदला देणार

 • सोलन जिल्ह्यात एक फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार

 • प्रत्येक घरात चार गायी खरेदीपर्यंत अंशदान देणार

 • स्मार्ट व्हिलेज प्रकल्प सुरू करण्यात येणार

 • टॅक्सी परमीटचा कालावधी दहाऐवजी पंधरा वर्षाचा करणार

 • येत्या पाच वर्षात ५ हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करणार

 • जंगल, वन आणि प्राणी संरक्षणासाठी वन संरक्षण अधिनियम प्रभावीपणे लागू करणार

 • नोटाबंदी आणि कोरोना काळात बंद झालेल्या उद्योगांची पुनर्बांधणी करणार. विशेष पॅकेज देणार