#DecodingElections : राहुल गांधी झिरो टू हिरो...

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

काँग्रेसचे 60 वे अध्यक्ष म्हणून राहुल यांची 11 डिसेंबर 2017 रोजी निवड करण्यात आली होती. 16 डिसेंबर रोजी त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. ते गांधी-नेहरु कुटुंबातील सहावे आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे 17 वे अध्यक्ष ठरले आहेत. मोदी लाटेत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. परंतु, काँग्रसेची सुत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी हे झिरो टू हिरो ठरू लागले आहे.

काँग्रेसचे 60 वे अध्यक्ष म्हणून राहुल यांची 11 डिसेंबर 2017 रोजी निवड करण्यात आली होती. 16 डिसेंबर रोजी त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. ते गांधी-नेहरु कुटुंबातील सहावे आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे 17 वे अध्यक्ष ठरले आहेत. मोदी लाटेत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. परंतु, काँग्रसेची सुत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी हे झिरो टू हिरो ठरू लागले आहे.

राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पाच राज्यांपैकी तीन मोठ्या राज्यात प्रचंड मोठी आघाडी घेऊन राहुल गांधी यांना वर्षपूर्तीची अनोखी भेट दिली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला विधानसभा निवडणूकीमध्ये मोठा धक्का बसत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठ यश मिळू लागले असून, काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्याच्या वर्षपूर्तीला राहुल गांधींना मोठं गिफ्ट आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मात्र, काँग्रेसने यावेळी भाजपला धोबीपछाड देत या दोन्ही राज्यात मोठी आघाडी घेऊन सत्तेत पुनरागमन केले आहे. तर राजस्थानातही मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची सत्ता जाताना दिसत आहे. या पाच राज्यांच्या निवडणुका म्हणजे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमी फायनल आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी भाजपवर जोरदार टिका करणे सुरू केले आहे. एक वर्षापूर्वीचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी यामध्ये मोठा फरक पहायला मिळतो. राहुल गांधी हे विविध मदुद्यावंर बोलत असून, सरकारला धारेवर धरत आहे. एक वर्षापुर्वी राहुल गांधी यांना पप्पू म्हटले जात होते आज त्यांची ओळख ही काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी अशी झाली आहे. एक वर्षांत राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केलेले पहायला मिळते. पक्षासाठी हे हिताचे आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ना राहुल यांच्याबद्दल फारशा आशा होत्या ना पक्षाबद्दल. 2014च्या लोकसभा निवडणुकीत पुरत्या चिंधडय़ा उडालेल्या काँग्रेसचे काहीच होऊ शकत नाही असे मानले जात होते. पण, राहुल गांधी यांनी चित्र बदलले आहे. 2019च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी व आजच्या निवडणूकांच्या चित्रावरून पक्षाला मोठे यश मिळणार हे पहायला मिळते. देशातून काँग्रेस हद्दपार होणार असे बोलले जात होते. पण, राहुल गांधी यांनी पक्ष पुन्हा नकाशावर आणला आहे.

राहुल गांधी यांनी मोदींवर केलेली ‘सूटबूट की सरकार’ ही टीका जिव्हारी लागली होती. यानंतर राफेलचा मुद्दा लावून धरला असून, देशाचा चौकीदार चोर आहे, असे म्हणत मोदींवर टिका करत आहेत. काँग्रेस समोर सर्वात मोठे आव्हान होते ते विविध राज्यांमध्ये आघाडी निर्माण करण्याचे. हेच काम राहुल गांधींनी केले आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी योग्य वेळी सुरू करून काँग्रेसने राजकीय गांभीर्याचे दर्शन घडवले आहे. एके काळी पप्पू म्हणून खिल्ली उडवणारे राहुल गांधी आज झिरो टू हिरो ठरत आहेत.

Web Title: congress president rahul gandhi zero to hero