काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित वैद्यकीय चाचण्या आणि तपासणीसाठी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायंकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले.

याआधीही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ही नियमित वैद्यकीय तपासणी असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president sonia gandhi admitted in hospital