esakal | प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील गायींची काळजी; योगींना दिला सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka_20Yogi_20

उत्तर प्रदेशात गायींची अवस्था भयावह असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे

प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील गायींची काळजी; योगींना दिला सल्ला

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

ललितपूर- उत्तर प्रदेशात गायींची अवस्था भयावह असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहिले आहे. गायींच्या रक्षणासाठी छत्तीसगडमधील आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारकडून धडा घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यांनी सौजानामधील मृत गायींची चित्रेही पत्रासोबत जोडली आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली सत्तेवर आलेले आदित्यनाथ सरकार गायींचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कोरोनाच्या व्हॅक्सिनमध्ये गाईचं रक्त; हिंदू महासभेनं केलं लस न वापरण्याचं आवाहन

उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात दहा गायी मृतावस्थेत आढळल्याप्रकरणी आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. गेल्या आठवड्यात माहरोनी तालुक्यातील सौजानामध्ये गायींच्या तात्पुरत्या गोठ्यातील गायी संशयास्पद अवस्थेत मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी कृष्णन शाक्य यांच्या तक्रारीवरून या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

यात जिल्हा पंचायत राज अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. माहरोनीच्या विभागीय दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी न्यायिक चौकशीचा आदेश दिला आहे. त्यांनी याप्रकरणी पुशवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व लेखापालांना निलंबित केले आहे.



 

loading image
go to top