esakal | कोरोनाच्या व्हॅक्सिनमध्ये गाईचं रक्त; हिंदू महासभेनं केलं लस न वापरण्याचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine1

आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी लस विकासाची प्रक्रिया जाहीर करावी, म्हणजे लोकांचा धर्म बुडणार नाही.

कोरोनाच्या व्हॅक्सिनमध्ये गाईचं रक्त; हिंदू महासभेनं केलं लस न वापरण्याचं आवाहन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेत तयार होत असलेल्या कोरोनावरील लशीत गाईच्या रक्ताचा समावेश असल्याने ती भारतात वापरू नये, असे आवाहन अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनीही केले आहे. हिंदू धर्म नष्ट करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप करीत ते म्हणाले की, गाईचे शेण व गोमूत्रापासून तयार केलेले औषध व लशीचा वापर हिंदू करू शकतात. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी लस विकासाची प्रक्रिया जाहीर करावी, म्हणजे लोकांचा धर्म बुडणार नाही.

कोरोनाच्या लशीची भारताला प्रतीक्षा असताना चीनच्या लशीला मुंबईच्या रझा अकादमीच्या सुन्नी मुस्लिम विद्वानांनी विरोध दर्शविला आहे. चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध (हराम) असल्याचे त्यांनी जाहीर केले.

West Bengal Assembly Election: भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचा डाव्यांसोबत प्लॅन

कोरोनावर चीनमध्ये तयार होत असलेल्या लशीत डुकराचे मांस असल्याचे वृत्त आल्यानंतर रझा अकादमीने ही लस वापरण्यास विरोध केला आहे. अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात डुकराच्या मासांचे अंश असलेली चीनी लशीच्या खरेदीसाठी नोंदणी करू नये, असे आवाहन भारत सरकारला केले आहे. भारतात तयार होणारी किंवा अन्य ज्या लशींची मागणी नोंदविली आहे, त्यातील घटकांची यादी सरकारने आम्हाला दाखवावी. म्हणजे त्याच्या वापराबद्दल घोषणा करता येईल.

राज्यातील 96 पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदावर पदोन्नती

लशीला ‘यूएई’त मान्यता

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लशीत डुकराचे मांस असले तरी ती मुस्लिमांना दिली जाणार असल्याचे संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने म्हटले आहे. डुकराच्या मांसापासून बनविलेल्या पदार्थांवर इस्लाममध्ये बंदी असली तरी ही लस मानवी शरीराच्या संरक्षणार्थ असल्याने तिचा संबंध याच्याशी जोडू नये. लशीत डुकराचे मांस हे अन्न नव्हे तर औषध म्हणून वापरले आहे, असे ‘यूएई’तील फतवा परिषदेने स्पष्ट केले आहे. यामुळे अशी लस मुस्लिमांनी घेण्यास परवानगी आहे, असे या परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दल्ला बिन बय्याह यांनी सांगितले.
 

loading image
go to top