'असल्या भाषेचं आजिबात समर्थन करू नका'; राहुल गांधी कमलनाथांवर गरजले

kamlnath and rahul gandhi
kamlnath and rahul gandhi

नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माजी कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांचा आयटम असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भाष्य केलं आहे. कमलनाथ यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत. 

कमलनाथजी आमच्या पक्षातील आहेत. पण, त्यांनी जी भाषा वापरली ती मला आवडली नाही. ते कोणीही असले तरी, मी त्याचे समर्थन करणार नाही. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. कमलनाथ यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी कमलनाथ आणि काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. 

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या प्रकरणावरुन कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. एक महिला आणि दलित मुलीसाठी अपशब्द वापरणाऱ्या कमलनाथ यांचा धिक्कार आहे. कमलनाथ यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, हा तो देश आहे जिथे द्रौपदीच्या अपमानामुळे महाभारत झाले होते. राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत चौहान यांनी कमलनाथ यांचा समाचार घेतला. कमलनाथ यांचे वक्तव्य म्हणजे राज्यातील महिलांचा आणि दलित मुलींचा अपमान असल्याचे भाजपने म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशवासियांना संबोधित करणार

कमलनाथ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं होतं. मी जे म्हटलं, त्यात कोणालाही दुखावण्याचाही हेतू नव्हता. मला त्यांचं नाव लक्षात येत नव्हतं. मी हातातल्या कागदावरील यादी वाचत होतो. त्यावर आयटम नंबर.1, आयटम नंबर. 2 असं लिहिण्यात आलं होतं. मग हा अपमान झाला का? शिवराज केवळ एक संधी शोधत आहेत, कमलनाथ कधीही कोणाचा अपमान करु शकत नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या आहेत. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इमरती देवी या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसचा त्याग करत भाजपत प्रवेश केला आहे. त्या आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com