Rahul Gandhi News : लोकांना कन्फर्म तिकीट घेऊनही...; रेल्वेच्या दुरावस्थेवरून राहुल गांधींचा मोदी सरकरवर निशाणा

मोदी यांच्या राजवटीत रेल्वेने प्रवास करणे ही शिक्षा बनली आहे, असेही राहुल गांधी म्हणालेत.
Congress Rahul Gandhi Share Railway Video Slam BJP PM Modi Govt Marathi News
Congress Rahul Gandhi Share Railway Video Slam BJP PM Modi Govt Marathi News
Updated on


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत रेल्वेने प्रवास करणे ही शिक्षा बनली असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडीयाच्या माध्यमातून केली. गांधी यांनी रेल्वेतील गर्दीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात शौचालयात बसलेली व्यक्ती दिसून येते आहे. 

मोदी यांच्या राजवटीत रेल्वेने प्रवास करणे ही शिक्षा बनली आहे. रेल्वेतील सामान्य श्रेणीचे म्हणजे जनरल डबे कमी करण्यात आले आहेत तर उच्चभ्रू लोकांसाठी जास्त गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य लोकांचा एकप्रकारे छळ सुरु आहे. तिकीट पक्के होऊनही लोकांना त्यांच्या जागेवर आरामात बसता येत नाही. त्यांना खाली आणि शौचालयात बसून प्रवास करावा लागत असल्याचे गांधी यांनी नमूद केले आहे.

Congress Rahul Gandhi Share Railway Video Slam BJP PM Modi Govt Marathi News
Arvind Kejriwal : ''केजरीवालांनी इन्सुलिन मागितलंच नाही, डॉक्टरांचाही सल्ला नाही'', तिहार जेल प्रशासनाचं उत्तर



आपल्या धोरणांमुळे रेल्वेला कमकुवत आणि अयोग्य बनवायचे. हे काम झाले की रेल्वे आपल्या मित्रांना विकायची, हा मोदी यांचा हेतू असल्याचा आरोप गांधी यांनी केला. सामान्य लोकांचे प्रवासाचे साधन असलेल्या रेल्वेला वाचवायचे असेल मोदी सरकारला सत्तेतून हटवावे लागेल, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

आजारपणामुळे टाळला प्रचार दौरा


दरम्यान तब्येत बरी नसल्यामुळे राहुल गांधी यांनी रविवारी सतना आणि रांची येथील प्रचार दौरा टाळल्याची माहिती कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली. मध्य प्रदेशातील सतना येथे जाहीर सभा तर रांची येथील इंडिया आघाडीच्या रॅलीला हजर राहण्यासाठी गांधी दिल्लीतून निघण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी आपले दौरे रद्द करावे लागले असल्याचे रमेश यांनी सांगितले. 

Congress Rahul Gandhi Share Railway Video Slam BJP PM Modi Govt Marathi News
Chinmay Mandlekar: "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून..."; मुलाच्या 'जहांगीर' या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.