
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदारांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील तसेच ताज्या विधानसभा निवडणुकीतील मतदार संघनिहाय तपशील स्वतंत्रपणे जाहीर करावा. तसेच या दोन्ही निवडणुकांमधील मतदान केंद्रनिहाय (बूथ) फॉर्म २० चा तपशील आयोगाने सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.