esakal | योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावर काँग्रेसनं दिलं प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath and Kapil Sibbal

योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावर काँग्रेसनं दिलं प्रत्युत्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काल उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बोलत असताना, योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो हे सांगताना पुर्वी फक्त 'अब्बा जान' म्हणणाऱ्यांना रेशन मिळायचे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना, २०१७ पुर्वी कुशीगरमध्ये सर्वांना रेशन मिळत होतं का? असा प्रश्न केला. तसेच तेव्हा फक्त अब्बाजान म्हणणाऱ्या लोकांना रेशन मिळत होतं असं सांगितलं. त्यावर प्रतिउत्तर देत आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी योगींवर निशाना साधला आहे. "आपल्या सरकारला सर्व समावेशक अफगाणिस्तान पाहिजे आहे, मात्र अब्बा जानचे वक्तव्य करणाऱ्या योगींना काय पाहिजे? सर्वसमावेशक उत्तर प्रदेश की, फोडा आणि राज्य करा?" असे म्हणत सिब्बल यांनी योगींना प्रश्न केला आहे. सिब्बल यांनी ट्विट करत हे मत मांडलं आहे.

हेही वाचा: 'अब्बा जान' म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं - CM योगी

दरम्यान, काल योगी आदित्यनाथ यांनी बोलताना, भारतीय जनता पक्षाच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो, सर्वांचा विकास केला जातो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाच्या पद्धतिचं कौतूक केलं होतं. मोदींनी देशाचं राजकारण बदललं, गाव, गरीब, शेतकरी, तरुण, महिला आणि समाजातील प्रत्येक समुहातील लोकांसाठी काम केल्याचं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं होतं. त्यामुळेच सर्वांचा समान स्वरुपात विकास होतोय, मात्र तुष्टीकरण कोणाचंही केलं जात नाही, भेदभाव केला जात नाही. आता राज्यात सर्वांना रेशन मिळतंय, मात्र पुर्वी फक्त 'अब्बा जान' म्हणणारे लोक रेशन संपवायचे अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली होती. पुढे ते असेही म्हणाले होते की, यापूर्वी कुशीनगरचं रेशन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये जात होतं, मात्र आता गरिबांच रेशन कुणीही पळवू शकत नाही. जर एखाद्याने तसा प्रयत्न केला तर तो तुरुंगात जातो.

loading image
go to top