esakal | 'अब्बा जान' म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं - CM योगी
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

'अब्बा जान' म्हणणाऱ्यांनाच पूर्वी रेशन मिळायचं - CM योगी

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुशीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना आदित्यनाथ यांनी यावेळी टीका करताना, भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता, मात्र आता सर्वांना समान न्याय मिळतो असे सांगितले. यावेळी पुढे त्यांनी २०१७ पुर्वी जे लोक अब्बा जान, अब्बा जान म्हणत होते, तेच सगळ रेशन संपवत होते अशी टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो, सर्वांचा विकास केला जातो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाच्या पद्धतिचं कौतूक केलं. मोदींनी देशाचं राजकारण बदललं, गाव, गरीब, शेतकरी, तरुण, महिला आणि समाजातील प्रत्येक समुहातील लोकांसाठी काम केल्याचं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळेच सर्वांचा समान स्वरुपात विकास होतोय, मात्र तुष्टीकरण कोणाचंही केलं जात नाही, भेदभाव केला जात नाही. आता राज्यात सर्वांना रेशन मिळतंय, मात्र पुर्वी फक्त 'अब्बा जान' म्हणणारे लोक रेशन संपवायचे अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, यापूर्वी कुशीनगरचं रेशन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये जात होतं, मात्र आता गरिबांच रेशन कुणीही पळवू शकत नाही. जर एखाद्याने तसा प्रयत्न केला तर तो तुरुंगात जातो.

हेही वाचा: मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?

योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल बोलताना, भारतीय जनता पक्षाचं सरकार येण्यापुर्वी देशाचं एका समुहाचं तुष्टीकरण करण्याचं राजकारण होतं. हे सरकार येण्यापूर्वी देशात भ्रष्टाचार होता, अराजकता होती, आतंकवाद होता, अत्याचार होता, अन्याय होता, मात्र आज सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विकास केला जातोय असं सांगितलं.

loading image
go to top