चीनकडून देणगी मिळाल्याच्या आरोपावर काँग्रेसने केला खुलासा...

Congress reveals allegations of donations from China
Congress reveals allegations of donations from China

नवी दिल्ली- राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मोठी देणगी मिळाल्याचा आरोप झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर निशाणा साधला होता. यावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिदंबरम यांनी जे. पी. नड्डा यांच्यावर अर्धसत्य सांगितल्याचा आरोप केला आहे. 

चिदंबरम यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा अर्धसत्य बोलण्यात तरबेज आहेत. माझे सहयोगी रणदीप सुरजेवाला यांनी काल त्यांचं सत्य बाहेर आणलं आहे. राजीव गांधी फाउंडेशनला 15 वर्षांपूर्वी मिळालेल्या अनुदानाचा आणि मोदी सरकारच्या नेतृत्वात चीनने भारतीय भूभाग बळकावल्याचा काय संबंध आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

नेहरू आणि मोदी : तेच ते आणि तेच ते (श्रीराम पवार)
समजा आरजीएफने 20 लाख रुपये परत केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेला चीन पुन्हा अतिक्रमण करणार नाहीत याचा विश्वास देऊ शकतील का? चीन बळकावलेला प्रदेश परत करेल का? आपले अपयश लपवण्यासाठी गतकाळातील गोष्टी उकरुन काढून त्या अर्धवट सांगण्याचं विकृत काम नड्डा यांनी सुरु केलं आहे. चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या प्रश्नांचे अगोदर उत्तर द्या, असं चिदंबरम म्हणाले आहेत.  

बाहुबलीचं लॉकडाऊन व्हर्जन, खुद्द दिग्दर्शकाने शेअऱ केला VIDEO
चीन संकटाच्या मुद्द्यावर सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या काँग्रेसला भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी उत्तर दिले होते. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून तब्बल 90 लाखांची देणगी 2004 - 2005 मध्ये मिळाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. तसेच आपत्तीग्रस्त काळात मदतीसाठी असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील आणि देशाची संपत्ती मानल्या जाणाऱ्या या निधीतील पैसा काँग्रेसच्या या फाउंडेशनकडे वळवण्यात आल्याचा आरोप नड्डा यांनी केला होता.

‘पीएमएनआरएफ’हा संकटकाळात देशवासीयांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेला सार्वजनिक निधी आहे. त्यातले पैसे ज्या राजीव गांधी फाउंडेशनकडे बेकायदा वळविले, त्याच्या अध्यक्ष कोण होत्या? सोनिया गांधी. या फाउंडेशनमध्ये बसले कोण आहे? त्याच सोनिया गांधी, असं म्हणत नड्डा यांनी टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com