"लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नेहमीच संविधानाच्या रक्षणासाठी पुढे असतात. यासाठी ते सातत्याने लढा देत आहेत. राहुल सत्याची बाजू घेऊन लढत असल्यामुळे भाजप सरकार त्यांना घाबरत आहे."
बेळगाव : भाजप सरकारने राबविलेले प्रत्येक धोरण संविधानविरोधी आहे. सत्तेसाठी संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक पक्षांची सरकारे सत्तेवर आली, मात्र भाजप सरकारकडून ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अवमान झाला, तसा कोणत्याही सरकारकडून झाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान हा देशातील गोरगरीब व दीनदलित जनतेचा, स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या नेत्यांचा अवमान आहे, असा घणाघात खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केला.